कोतवालीची ‘डिबी’ स्थापन; ‘या’ कर्मचाऱ्यांचा समावेश

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेली कोतवाली पोलीस ठाण्याची डिबी (गुन्हे प्रगटीकरण शाखा) बरखास्त करण्यात आली होती. आता पुन्हा नव्या दमाची डिबी स्थापन करण्यात आली आहे.(Ahmednagar Police)

कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील कत्तलखाने, बायोडिझेलचा उद्योग या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासह हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे.

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या डिबी पथकात पोलीस अंमलदार योगेश कवाष्टे, गणेश धोत्रे, दीपक रोहोकले, अमोल गाडे, रिंकू काजळे, सोमनाथ राऊत, सलीम शेख, नितीन शिंदे व अभय कदम यांचा समावेश आहे.

डिबीचे प्रमुख म्हणून पोलीस अंमलदार कवाष्टे यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. शहरातील मध्यवर्ती भागाच्या कायदा- सुव्यवस्थेची जबाबदारी असणार्‍या कोतवालीतील डिबी मागील 10 दिवसांपूर्वी तडकाफडकी बरखास्त करण्यात आली होती.

या डिबीमध्ये प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्यासह 16 कर्मचार्‍यांचा सहभाग होता. कोतवालीच्या डिबी पथकामध्ये दोन गट निर्माण झाले होते.

दोन गटाच्या वादात दाखल गुन्ह्याची उकल करण्यात डिबी पथकाला अपयश आले होते. याशिवाय इतर उद्योग करण्यात या कर्मचार्‍यांनी भर दिला होता.

यामुळेच पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यावर डिबी बरखास्त करण्याची वेळ आली होती. आता पुन्हा नव्या दमाची डिबी स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्यावर अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबरोबरच गुन्ह्यांच्या उकलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe