५०वर्षांपासुन ‘ते’ प्रश्न न सुटल्याने कोतवालांचे आजपासून कामबंद

Published on -

अहिल्यानगर : चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा,या प्रमुख मागणीसाठी राज्यातील कोतवालांनी (महसूल सेवक) आज गुरूवारपासून पासून काम बंद आंदोलनाही हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु होणार असल्याची माहिती कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ यांनी दिली.

मंगळवारी कोतवाल संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना दिले.या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष संदीप गाडेकर,महिला प्रतिनिधी मेघना दळवी,नगर तालुकाध्यक्ष अंकुश कोळेकर,बाबासाहेब दरेकर,शीतल कोठुळे,सुनीता जाधव,शीतल जाधव आदींच्या सह्या आहेत.निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील कोतवाल हे महसूल विभागाचा महत्वाचा घटक आहे.

इंग्रजांच्या राजवटीपासून हा घटक कार्यरत आहे.कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी गेल्या ४० ते ५० वर्षांपासून प्रलंबित आहे.राज्य शासनाने चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले.मात्र,या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही.दरवर्षी १० टक्के वेतन वाढ करण्याचे २०२६ पासून मान्य केले आहे.यामुळे कोतवालांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.

संघटनेचे राज्याध्यक्ष नामदेव शिंदे यांनी यासंदर्भात निवेदन देत राज्यव्यापी आंदोलनाही पूर्वसूचना दिली आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील कोतवाल ही सहभागी होणार आहेत.मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरु होणार असल्याचे योगेश मिसाळ यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe