केटीएमचा स्पीड ठरला जीवघेणा ! दुचाकी घरावर जाऊन आदळली तरुणाचा जागीच मृत्यू

Published on -

Ahmednagar News : भरधाव वेगाने दुचाकीवर जाणाऱ्या पवन रोहिदास पवार (वय १९, आंबी खालसा, ता. संगमनेर) याने एका घराला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. बुधवारी सकाळी ८ वाजता तालुक्यातील घारगाव येथे ही घटना घडली.

पवन पवार केटीएम दुचाकी (एम.एच. १७, ओ. झेड ८३४२) वरून भरधाव वेगाने चालला होता. त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो थेट महेश पिसाळ यांच्या घरावर जाऊन आदळला.

दुचाकीच्या वेगामुळे घराची भिंत ढासळली. घारगाव पोलिस स्टेशनचे उमेश पतंगे यांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पवन पवार याचेवर संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी आंबी खालसा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घारगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe