Ahilyanagar News:- जलसिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी हा शेतकऱ्यांसाठी खूप कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असून राज्यातील बरेच क्षेत्र हे सिंचन प्रकल्पांच्या कालव्याच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण श्रीगोंदा तालुक्याचा विचार केला तर या तालुक्याचे देखील बरेच क्षेत्र हे कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येते.
श्रीगोंदा तालुक्यात प्रामुख्याने ज्वारी तसेच गहू व हरभरा पिकांची मोठ्या प्रमाणावर सध्या पेरणी करण्यात आलेली आहे. परंतु कुकडीच्या पाण्याकरिता जलसिंचन विभागाचा आठमाही धोरणानुसार पाण्याचा फार्मूला आहे. परंतु त्यानुसार शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात शेतकऱ्यांची मात्र पाणी नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
कुकडी लाभक्षेत्रामध्ये प्रत्येक वर्षाला पाण्याची मागणी करावी लागते व याकरिता शेतकऱ्यांना रास्ता रोको तसेच जलसमाधी आंदोलन, अधिकाऱ्यांना घेराव घालणे इत्यादी सारखे आंदोलने करावी लागतात व तेव्हा कुठे पाण्याचे आवर्तन हे शेतकऱ्यांना मिळत असते.
या तुलनेत मात्र जर आपण घोड लाभक्षेत्राचा विचार केला तर या ठिकाणी पाण्याचा अतिशय योग्य पद्धतीने नियोजन केले जाते. त्यामुळे घोड लाभक्षेत्रामध्ये आवर्तनाची कमतरता कधीही भासत नाही आणि गरज असेल तेव्हा वेळोवेळी पाण्याचे आवर्तन सोडले जातात. परंतु जलसिंचन विभागाच्या माध्यमातून कुकडी लाभक्षेत्रात मात्र आठमाही धोरण राबवत नाही तोपर्यंत कुकडी लाभक्षेत्रामध्ये पाण्याची कमतरता अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.
कुकडीचा समावेश आठमाही धोरणात व्हावा- शेतकऱ्यांची मागणी
जर आतापर्यंतचा इतिहास बघितला तर श्रीगोंदा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी जेव्हा सत्तेत होते तेव्हा देखील कुकडीच्या आठमाही धोरणावर 35 वर्षात एकदाही आवाज उठवलेला नाही. यामुळेच कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी पाहण्यासाठी आंदोलने करूनच आवर्तन मिळवावे लागते
या लाभक्षेत्रामध्ये श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचन आहे व त्यात द्राक्ष बागा, लिंबू फळबागा तसेच डाळिंबाच्या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु उन्हाळ्याच्या कालावधीत मात्र पाण्याचे योग्य आवर्तन नसल्याने या फळबागांना पाण्याची मोठी कमतरता जाणवायला लागते व अनेक शेतकऱ्यांचे यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
पाण्याअभावी आणि उन्हाळ्यात शेतकऱ्यांची खूप मोठे हाल होतात. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी कुकडी लाभक्षेत्राचा समावेश आठमाही धोरणात करणे गरजेचे आहे.
दिवसेंदिवस पावसाचे अत्यल्प होत असलेल्या प्रमाणामुळे कुकडीचा समावेश आठमाही धोरणात होण्याकरिता विधानसभेत लोकप्रतिनिधीनी शेतकऱ्यांच्या भावना उपस्थित कराव्यात अशा प्रकारची मागणी कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून आता केली जात आहे.