Ahmednagar News:श्रीगोंदा कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पा. कुकडी सहकारी साखर कारखान्याने ऊस दराची भूमिका जाहीर केली असून, चालू ऊस गाळप हंगामातील उसाला पहिला हप्ता दोन हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला असून,
दोन टप्प्यांत उसाचा हप्ता काढला जाणार असल्याची माहिती कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी देत उसाच्या दराबाबत इतर साखर कारखान्यांशी स्पर्धा करत आघाडीवर राहणार असल्याचे सांगितले.
तालुक्यातील साखर कारखाने सुरू होऊन वीस दिवस उलटले तरी अद्याप उसाचा दर कोणत्याच कारखान्याने घोषित केला नसल्याने उसाला पहिला हप्ता किती रुपयांचा मिळणार,
याबाबत शेतकरी वर्गात उत्सुकता असतानाच कुकडी कारखान्याचे अध्यक्ष, मा. आ. राहुल जगताप यांनी ऊस दराबाबत आघाडी घेऊन उसाला पहिला हप्ता दोन हजर पाचशे रुपये काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.
याबाबत बोलताना राहुल जगताप म्हणाले, चालूवर्षी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. कुकडी कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना पहिल्या हप्त्यासोबत आणखी दोन हप्ते देणार असून, तालुक्यातील इतर कारखान्यांच्या बरोबर उसाच्या बाजारभावाची स्पर्धा करत शेतकऱ्यांना भाव देणार असल्याची माहिती दिली.