शेवगाव तालुक्यातील पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची नासाडी !

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील चापडगाव नजीक असणाऱ्या शेवगाव-गेवराई, या राज्य महामार्गावरील कांबी फाट्याजवळ असणाऱ्या गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या एअरव्हॉलमधून

गेल्या आठ दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे व्हिडिओ फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर व्हायरल होताच गेवराई नगरपरिषद प्रशासनाने याची दखल घेत पाईपलाईनची दुरुस्ती केल्याने होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टळला.

पैठणच्या जायकवाडी जलाशयातून गेवराई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या पाईपलाईनच्या चापडगाव येथील कांबी फाट्याजवळील एअरव्हॉलशी अज्ञात इसमाने छेडछाड केल्याने

गेल्या आठ दिवसांपासून दिवसभरात किमान लाखो लिटर पाण्याची नासाडी होत होती. सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असताना याकडे संबंधित गेवराई नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आल्याने याविषयी नागरिकांत मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.

या राज्य मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद होत होते, तर काही जणांनी मोबाईलच्या स्टेटसला या पाण्याचे विहंगम दृश्य ठेवल्याने याची चर्चा होऊन काहींनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनास दूरध्वनीवरून संपर्क केल्यानंतर गेवराई नगरपरिषद पाणीपुरवठा प्रशासनाने हे पाणी बंद केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe