एकदा लवासाची श्‍वेतपत्रिका काढावीच लागेल : महसूलमंत्री विखे

Published on -

Ahmednagar News : आ.रोहीत पवार यांनी केलेले आरोप म्‍हणजे त्‍यांचे नैराष्‍य दाखवून देते. तुमच्‍यावर सुरु असलेल्‍या ईडी कारवायांमुळे आता काय समोर येईल हे जनतेला पाहायचे आहे. परिक्षांबाबत कोणतीही श्‍वेतपत्रिका काढायला आमची तयारी आहे.

मात्र एकदा लवासाची श्‍वेतपत्रिका काढावीच लागेल असा गर्भित इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

आजवर सर्वात पारदर्शी अशी पध्‍दत तलाठी भरतीसाठी वापरण्‍यात आली,मात्र जाणीवपुर्वक सरकारची बदनामी करण्‍यासाठी बेछूट आरोप केले जात आहेत.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्‍व मान्‍य करुन, अजीत दादा पवार देखील महायुतीत सहभागी झाले.

ट्रीपल इंजीन सरकार राज्‍यात जनतेच्‍या हिताचेच निर्णय घेत असून, एक रुपयात पीक विमा योजनेपासून ते आनंदाचा शिधा देण्‍याचे महत्‍वपूर्ण निर्णय राज्‍यातील महायुती सरकारने घेतला आहे. शेतक-यांच्‍या हितासाठी दूध उत्‍पादकांना पाच रुपयांचे अनुदान तसेच नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये शेतक-यांना भरीव मदत करण्‍याची भूमिका सरकारने घेतली आहे.

येत्‍या २२ तारखेला श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा गावोगावी आनंदाने साजरा करा असे आवाहन देखील त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe