अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. नुकतेच नेवासा तालुक्यातील एका घरावर चोरटयांनी दरोडा टाकत लाखोंचा माल लंपास केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथे पोपट गोरक्षनाथ शिसोदे यांच्या राहत्या घरी रात्री तीन वाजेच्या सुमारास दरोडा पडला.
या दरोड्यात १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल व मोबाईल लंपास केला असून कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली आहे. घटनास्थळी शेवगाव उपविभागीय
अधिकारी सुदर्शन मुंढे व नेवासा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी भेट दिली आहे व तपास पथके रवाना केली आहेत. तसेच नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- हमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम