विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे नगरमध्ये पडसाद… कुठे अंडाफेक तर ….

Pragati
Published:

Ahmednagar News : लोकसभेच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी यांनी सत्ताधारी पक्षाचे नेते हिंदू नाहीत, कारण ते २४ तास हिंसा व द्वेष पसरवत असतात. असे वक्तव्य केले होते.

त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी हिंदू जनतेचा अपमान केल्याचे म्हणत सत्ताधाऱ्यांनी अधिवेशनातच गदारोळ केला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्याचे लोकसभेच्या बाहेर देखील पडसाद उमटत आहेत. नगरमध्ये देखील या घटनेचे पडसाद उमटले आहेत.

विरोधी पक्षनेते खा.राहूल गांधी यांनी ‘त्या’ वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यात म्हणजे संगमनेरमध्ये तर विरोधी पक्षनेते खा.राहूल गांधी यांच्या प्रतिमेस अंडा फेक आंदोलन करण्यात आले. नगर शहरात देखील भारतीय जनता युवा मोर्चा कडून निषेध करण्यात आला.

नगरमधील चितळेरोड येथील काँग्रेसच्या कार्यालयावर भारतीय जनता युवा मोर्चा शहर जिल्ह्यध्यक्ष मयूर बोचुघोळ, बंटी ढापसे, सचिन पावले, सुजय मोहिते, अजित कोतकर, आदेश गायकवाड, सुरेश लालबागे आदी कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा निषेध करून कार्यलयाच्या शटरवर निषेधाचा फलक लावला, या मुद्यावरून आता वाद वाढायला सुरुवात झाली आहे.

विरोधी पक्षनेता म्हणून पहिल्यांदा बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. भाजपचे लोक २४ तास हिंसाचाराची भाषा बोलत असतात; पण हिंदू कधीही हिंसाचार, द्वेष आणि भीती पसरवत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले हिंसाचाराच्या आरोपावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लागलीच आक्षेप घेत काँग्रेस नेत्याने संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हटल्याचा आरोप करत राहुल गांधी यांचा निषेध करून कार्यलयाच्या शटरवर निषेधाचा फलक लावला.

 

काय म्हणाले होते खा. राहुल गांधी
सत्ताधारी पक्षाचे नेते हिंदू नाहीत, कारण ते २४ तास हिंसा व द्वेष पसरवत असतात, असा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. यावर राहुल गांधी हे संपूर्ण हिंदू समाजाला हिंसाचारी म्हणत असल्याचा आक्षेप सत्ताधाऱ्यांनी घेतला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएस म्हणजे पूर्ण हिंदू समाज नाही, असा पलटवार राहुल गांधी यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe