सक्तीने वसुली करण्यासाठी महापालिका काय काय करणार घ्या अधिक जाणून

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :- जसा जसा मार्च महिना जवळ येईल तसे महापालिकेला वसुलीचे वेध लागतात. गेल्या नऊ महिन्यात वसुलीसाठी महापालिकेने विविध प्रयत्न केले परंतु पाहिजे त्या प्रमाणात वसुली झाली नसल्यामुळे महापालिका आता कडक पावले उचलत आहे असे महापालिकेने सांगितले.

नऊ महिन्यात वसुलीचे प्रमाण फक्त १६.९८ टक्के आहे. मागणी २२३.३२ कोटींची आहे. वसुली मात्र केवळ ३७.४१ कोटी झाली आहे. वसुली करण्यासाठी कायकाय करण्यात येईल महापालिकेचे बहुतेक खर्च घरपट्टी,पाणीपट्टी,प्लाटवरील कर इत्यादी रकमेवर अवलंबून असतात.

महापालिकेकडून आता वसुलीसाठी जप्ती, वॉरंट आणि लिलावाचा फंडा वापरण्यात येणार आहे. एव्हढेच नव्हे, तर चौकाचौकात मोठ्या थकबाकीदारांच्या नावाचे फलकही लावण्याचे नियोजन करत आहे.

विकास कामे, कर्मचाऱ्यांचे पगार, प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी महापालिका करातून मिळणाऱ्या रकमेवरच अवलंबून असते. सफाई कर्मचारी पगारासाठी कायम आंदोलन करतात. विकास कामांसाठी निधी कमी पडतो. कर भरणा वाढवण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार वेगवेगळे प्रयोग होत असतात.

मागील वर्षी शास्ती माफी दिली होती. परंतु वसुली हव्या त्या प्रमाणात झालीच नाही. शहरात बहुतेक उपनगरांत गुंतवणूक म्हणून प्लाट घेण्यात आलेले आहेत. त्यावर बांधकामे नसली, तरीही त्यांच्याकरडून कर येणे असते.

संबंधित प्लाटधारक नियमित कर भरत नाहीत. थेट खरेदी-विक्रीच्या वेळी ही रक्कम भरली जाते. व्यवहार झाल्यानंतर महापालिकेकडे नाव नोंदणी होत नाही. त्यामुळे नेमका मालक कोण, हे लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे वसुलीस अडचण येते.

आकडे काय सांगतात

मागील एकूण वसुली – 197.55

मागील थकबाकी – १७६.६२

कोटी मागील वसुली जमा -२०.९३

टक्के चालू वसुलीची रक्कम – २२३.३२

कोटी चालू वसुली जमा – ३७.४१

कोटी चालू वसुल होणारी रक्कम 185.91

कोटी पुढील तीन महिन्यांत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी दुकाने सीलही करण्यात आली आहेत. नागरिकांनी करांची थकबाकी भरून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे व महापालिकेकडून वसुलीसाठी होणारी कटू कारवाई टाळावी.

– सुनील चाफे, सहाय्यक करमूल्य निर्धारक, महापालिका

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe