Ahmednagar News : तुमचा धर्म सोडा व आमचा धर्म स्वीकारा ! शिक्षिकेची धमकी आमच्या धर्माच्या मुलांबरोबर बोलत जा…

Published on -

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना तुमचा धर्म सोडा व आमचा धर्म स्वीकारा म्हणत त्यांचा विनयभंग करण्यात आला, तसेच त्यांच्या क्लासच्या शिक्षिकेने आमच्या धर्माच्या मुलांबरोबर बोलत जा, अशी चिथावणी दिल्याने त्या शिक्षिकेसह नऊ जणांवर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की या दोन पीडित मुली एका खासगी क्लासला जात होत्या. दरम्यान त्यांना थांबवून आरोपी त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करायचे. मुली क्लासमध्ये गेल्यावर तेथील आरोपी महिला शिक्षिका पीडीत मुलीला तुम्ही माझ्या धर्माच्या मुला-मुलींशी बोलत जा, असे सांगुन आरोपीशी जाणीवपूर्वक बोलायला लावायची.

दरम्यान आरोपींनी या मुलींना वेळोवेळी धमकावले. त्यांचा पाठलाग केला. आरोपींनी “तुम्ही तुमचा धर्म सोडा, आमच्या धर्माचा स्वीकार करा, आमच्या धर्माच्या चालीरिती स्वीकारा, आपण लवकर घर सोडून पळून जाणार आहोत. त्यासाठी आपल्याला इतर लोक मदत करणार आहेत,” असे सांगुन फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

याबाबत पीडीत मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनयभंग व पोक्सो अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe