नवरात्रौत्सवात शांतता भंग केल्यास कायदेशीर कारवाई

Ahmednagarlive24 office
Published:
Navratri Festival

Navratri Festival : जागृत देवस्थान भोकरची रेणुका मातेची गावावर कृपा असल्यामुळे आजपर्यंत उत्सवामध्ये शांतता भंग झालेली नाही. परंतु या धार्मिक कार्यक्रमात बाधा आणणारे व मद्यपी तळीरामांवर कायदेशीर कडक कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त झालेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील बाबासाहेब साळवे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी होते. याप्रसंगी पोलीस निरिक्षक चौधरी म्हणाले की, नवरात्र उत्सव व निवडणूक दोन्हीही एकाच वेळी असल्यामुळे आचारसंहीतेचे नियम पाळून राजकारण बाजुला ठेवुन धार्मिक कार्यक्रम साजरा करावा.

काळात बंदोबस्तासाठी दोन अंमलदाराची याठिकाणी नियुक्ती करणार असून सर्वांनी सहकार्य करावे, असे अवाहन यावेळी त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe