केडगावमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद..! हल्ल्यात तिघे जखमी; जुन्नरच्या टिमला यश

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : केडगावच्या अंबिकानगर परिसरात शनिवारी (दि. २४) बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातल. धुमाकूळ घालणार्‍या बिबट्याने दोघांवर हल्ला केला.

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असून, धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याल्य जेरबंद करण्यात वन विभागाच्या पथकाला सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास यश आले.

बिबट्या पकडल्याने केडगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडल. बिबट्याची दहशत कशी असते, याची प्रचिती केडगावकरांना शनिवारी जाणवली.

वन विभागाच्या नगरच्या टिमला बिबट्या पकडण्यात अपयश आले. मात्र जुन्नरच्या टिमने मोठ्या शिताफीने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन मारुन पकडले,

एरव्ही घनदाट जंगलात, ऊसाच्या फडात, दऱ्या खोऱ्यात, राना वनात आढळून येणारा बिबट्या चक्क गजबजलेल्या केडगावच्या अंबिकानगर परिसरात शनिवारी सकाळी आढळून आला.

शनिवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडून भितीचे वातावरण निर्माण झाले. अंबिकानगरच्या परिसरात बिबट्या सैरावैरा फिरु लागला. निबट्याच्या हल्ल्यात व्यावसायिक अरुण चौरे, विजय चव्हाण व दीपक धस हे इसम जखमी झाले.

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले इसम रक्‍तभंबाळ झाला होता. त्यांना तत्काळ औषधोपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. डॉ. जोशी यांच्या बंगल्याच्या जवळ बिबट्याचे पहिल्यांदा दर्शन झाले. तदनंतर शाम पुजारी यांच्या घरामागील बाजूकडे बिबट्याने धूम ठोकली.

बिबट्याच्या संचाराने अंबिकानगर ‘परिसरात प्रचंड धावपळ उडून गेली. बिबट्याला बघण्यासाठी इमारतींवरील गच्चीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इकडे आला, तिकडे गेला, तेथे घुसला…. असा आरडाओरड जोरजोरात सुरु होता.

नागरिकांच्या गोंधळामुळे बिबट्या बिथरला होता. पिसाळलेल्या कुत्र्यासारखा बिबट्या इकडून तिकडे धावत होता. ल्हान मुलांना वाचविण्यासाठी शाळा लवकर बंद करण्यात आल्या. भाजीपाला त्याचप्रमाणे इतर दुकानेही तत्काळ बंद करण्यात आली.

स्थानिक नागरिकांना वन विभागाला बिबट्या आल्याची खबर दिली. वन विभागाचे स्थानिक कर्मचारी उशिरा अंबिकानगरमध्ये दाखल झाले.

उशिरा येवूनही बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्यात त्यांना यश येत नव्हते. बिबट्या पकडण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी साधनसामुग्री नव्हती. वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अंबिकानगर परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

दरम्यान, अंबिकानगर परिसरात बिबट्याचा वावर सुरुच होता. इकडून तिकडून बिबट्या धावत होता. शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी विशेष सहकार्य केले. केडगाव परिसरात पहिल्यांदाच बिबट्याचे दर्शन झाले अन्‌ त्यांची दहशतही नागरिकांनी अनुभवली.

माजी नगरसेवकांचे विशेष प्रयत्न

अंबिकानगर परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले. बिबट्यामुळे परिसरात गोंधळ उडून भितीचे वातावरण निर्माण झाले.

त्यातच बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडल् होता. माजी नगरसेवक दिलीप सातपुते, मनोज कोतकर आदींनी घटनास्थळी धाव घेवून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग व पोलिस दलाला तत्काळ कळवले.

नागरिकांना धीर देण्यासाठी सातपुते, कोतकर आदी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी माजी नगरसेवक परिसरात ठाण मांडून होते. बिबट्याला पकडल्यानंतर माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe