Ahmednagar News : बिबट्याने भरदिवसा चार-पाच शेळ्यांचा फडशा पाडला पिंजरा लावण्याची मागणी

Published on -

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव येथील शेटे वस्ती भागात बिबट्याने घुमाकूळ घातला आहे. मागील दोन दिवसात भरदिवसा चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वळदगाव सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब शेटे यांनी केली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून वळदगाव- उंबरगाव शिवेवर असलेल्या माजी सरपंच बाबासाहेब शेटे यांच्या वस्ती परिसरात दोन बिबटे दबा धरुन बसले असून ते दिवसाही अनेकांना दर्शन देत आहेत.

त्यामुळे शेतात काम करणारे मजूर व वस्ती परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वस्तीच्या पूर्वेला काही अंतरावर जागृत काळभैरवनाथ मंदिरात नित्याने भाविकांची वर्दळ असते. याशिवाय शाळा, महाविद्यालयासह परिसरातील नागरिक बाजूच्या रस्त्याने दैनंदिन कामांसाठी ये-जा करीत असतात.

बिबट्याने भरदिवसा चार-पाच शेळ्यांचा फडशा पाडला आहे. ही बाब लक्षात घेता संभाव्य मानवी हानी रोखण्यासाठी वन विभागाने तातडीने पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी बाबासाहेब शेटे, अशोक भोसले, अॅड. मधुकर भोसले, अशोक भांड, रमेश भोसले, पोपट भोसले, प्रतापराव शेटे, सुदाम शेटे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News