नेवासा तालुक्यातील या भागात बिबट्याची दहशत ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Published on -

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील चांदा- रस्तापूर रोड परिसरातील वस्त्यावर बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्तापूर रोड लगत वस्तीवर राहणारे आदिनाथ वामन व रामनाथ वामन यांच्या वस्तीवर गेल्या चार दिवसांपासून उसाच्या शेतातून वस्तीजवळ शिकारीच्या शोधात बिबट्या येत आहे.

परिसरातील शेतकरी रामनाथ वामन यांना घराशेजारील उसात मंगळवारी रात्री प्रत्यक्ष बिबट्याने दर्शन दिल्याने ते काही वेळ चांगलेच गडबडले. त्यांनी घरात जाऊन परिसरातील वस्त्यांवरील शेतकऱ्यांना फोन करून बिबट्या आल्याची माहिती दिली.

तसेच संदिप जावळे व भाऊराव जावळे हे आपल्या कुटुंबियासमवेत पोर्च मध्ये जेवण करत असतांनी त्यांचे कुत्रे घाबरून घराकडे आले. त्यापैकी एका कुत्र्याची मान रक्तभंबाळ झालेली होती.

त्याच दरम्यान किशोर शंकर वामन यांना हा बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड केला. तसेच कानिफ सुखदेव दहातोंडे यांना या बिबट्याने दर्शन दिले. असे अनेकांनी या बिबट्याला पाहिले.

त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्याने या बिबट्याला तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी आदिनाथ वामन जावळे, रामनाथ वामन भाऊराव जावळे, कानिफनाथ दहातोंडे, किशोर वामन, शिवाजी अंबाडे, विजय वामन, अरुण जावळे व आबा दहातोंडे, बाळासाहेब जगताप, श्रीकांत चौरे, भाऊसाहेब जावळे आदी शेतकऱ्यांनी केली.

बिबट्याच्या दहशतीने वस्तीच्या बाहेर रात्री कोणी पडायला तयार नाही. लाईट पण रात्री उशिरा येते व पहाटे पाचलाच पुन्हा लाईट बंद होते. त्यामुळे या भागात काही काळ अंधाराचे साम्राज्य असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News