लग्नाला महिनाही झाला नाही तोच तरुणाचा अपघातात मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-नेवासा शहरात फोटोग्राफी व्यवसाय करत असलेल्या तरुणाचा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात रस्ते अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, नेवासा येथे मागील दहा-पंधरा वर्षापासून परमेश्‍वर गणेश नरवटे (वय 27) हा तरुण फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता.

बसस्टॅण्डजवळ त्याचा फोटोग्राफीचा स्टुडिओ आहे. तो मुळचा केज तालुक्यातील रहिवासी होता. केज-बीड रोडवर मोटारसायकलवरुन जात असताना परमेश्‍वर नरवटे याच्या मोटारसायकलची व एका कारची समोरासमोर धडक झाली.

धडक होताच दुचाकीने पेट घेतला. दुचाकी आगीत जळून खाक झाली तर दुचाकीवरील परमेश्वर नरवटे याचा मृत्यू झाला. त्यांचे पश्चात आई वडील, बहिण, पत्नी असा परिवार आहे.

परमेश्वर याचा 23 दिवसांपूर्वी विवाह झाला होता आणि आज त्याच्यावर काळाने घाला घातल्याने नेवाशासह केज तालुक्यातील इस्थळ गावावर शोककळा पसरली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment