नगर शहरातील ‘या’ पक्षाच्या अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे.(Ahmednagar Crime)

आजही अनेक पक्षातील नेते,कार्यकर्ते यांच्याशी गायकवाड यांचे जवळकीचे संबंध आहेत, अशात त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय कार्यकर्त्यांत व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अशोक गायकवाड घरी आले असता त्यांना पोस्टाने एक पत्र आले होते. पत्रात त्यांना आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा मजकूर लिहिला होता.

सदर पत्रात एका व्यक्तीचे नाव पत्र पाठवणारा म्हणून असले तरी गायकवाड आणि इतर कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता संबंधित व्यक्तीने आपला या पत्राशी संबंध नसल्याचे सांगितले आहे.

हा खोडसाळपणा आहे कि इतर काही याबाबत गायकवाड पोलिसांत तक्रार देणार आहेत.आता पर्यंत पन्नासवर्षाच्या समाजकारणात आपण बहुजन, मागासवर्गीय समाजासाठी विविध व्यासपीठांवर अथवा आंदोलनातून काम केले आहे,

अनेकदा धमक्या आल्या आहेत पण आपण आजही न डगमगता समाज एकजुटीचे आणि समाज उन्नतीचे काम करत आलो आहे, त्यामुळे अशा धमक्यांना आपण आजही घाबरत नाही असे गायकवाड यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe