MLA Nilesh Lanke : महाविकास आघाडी सरकारच्या काळात पारनेर, नगर मतदार संघातील मंजूर करण्यात आलेल्या ३८ कोटी ६ लाख ८५ हजार रुपये खर्चाच्या कामांना देण्यात आलेली स्थगिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उठविली असून, ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.
दरम्यान, दलित वस्ती सुधार योजनेतील १ कोटी रुपये खर्चाच्या कामांचा मार्गही मोकळा झाला असल्याची माहिती आ. नीलेश लंके यांनी दिली.
आ. लंके यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विकास कामांसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला होता.
शिवसेनेमध्ये फूट पडून सत्तेवर आलेल्या शिंदे, फडणवीस सरकारने महाविकास आघाडीने मंजूर केलेल्य कामांना स्थगिती दिली होती. बजेट बुकमध्ट कामांची नोंद झाल्यानंत कामांना स्थगिती देता येत नसतानाही त्यावेळी ही कामे रोखण्यात आल होती.
शिंदे, फडणवी सरकारमध्ये अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले व त्यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी आली ना. पवार यांच्याकडे पाठपुराव केल्यानंतर स्थगिती देण्यात आलेल्य सर्व कामांची स्थगिती उठविण्याचे आदेश पवार यांनी दिले. त्यामुळे ही कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळ झाला आहे.