पशुधन आले धोक्यात; वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागातील जनावरे दगावतायत

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात सुरू असलेला अवकाळी पाऊस अन गारठ्याचा मोठा फटका शेतकऱ्यांसह पशुपालकांना बसतो आहे.

जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर आणि नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंंढ्या दगावल्या असल्याची धक्कादायक घटना घडू लागल्या आहे.

जिल्ह्यात गुरूवारी सांयकाळीपर्यंत संततधार पाऊस थंडीमुळे 714 शेळ्या-मेंढ्या दगावल्या असून 125 वर उपचार सुरू आहेत.आकडेवारी पाहता अंदाज येऊ शकतो कि बदलत्या हवामानामुळे पशुधन धोक्यात आले आहे.

तर या आर्थिक नुकसानीमुळे पशुपालक चिंताग्रस्त झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जिल्ह्यात पारनेर तालुक्यात मोठ्या संख्येने मेंढीपालन व्यवसाय केला जातो.

मेंढ्यांना छत नसलेल्या बंदिस्त जागी ठेवण्याची पद्धत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस आणि सोबतच गारठा आहे. त्याचा फटका मेंढ्यांना बसला.

पाऊस आणि गारठा सहन झालेल्या मेंढ्यांचा ठिकठिकाणी मृत्यू झाला. जिल्ह्यातील 46 गावातील 106 पशूपालकांना याचा फटका बसला आहे. यात पारनेर तालुक्यातील 19 गावात 50 पशूपालकांच्या 509 शेळ्या-मेंढ्या दगावल्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील 23 गावातील 41 पूशपालकांच्या 148 तर नगर तालुक्यातील एका गावात 7 पशूपालकांच्या 34 शेळ्या-मेढ्या दगावल्या आहेत.

तर श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात 1 पूशपालकाच्या 7, अकोले तालुक्यातील 1 गावात 1 पशूपालकांच्या 4 आणि कर्जत तालुक्यातील 1 गावात 6 पशूपालकांच्या 12 शेळ्या-मेंढ्या दगावाल्या आहेत.

तर 125 शेळ्या-मेंढ्यांवर तातडीने उपचार करण्यात आला आहे.