स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक १८ जानेवारी ला; मतदारांना सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  येत्या १८ जानेवारी २०२२ रोजी राज्यातील ९५ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका, २ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुका तसेच,

सांगली-मिरजज-कुपवाडा महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सावर्जनिक सुट्टी देण्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.

मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी ही सावर्जनिक सुट्टी खाली नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू राहणार आहे.

त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे.

राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ,

वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील ९५ नगरपंचायतीं करिता, तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्या आणि सांगली-मिरज-कुपवाडा या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकांकरिता ही सावर्जनिक सुट्टी असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe