मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

जिल्ह्यात लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार दि. 13 मे, 2024 रोजी मतदान सुरु झाल्यापासुन ते संपेपर्यंत मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील मतदान होणाऱ्या केंद्रापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेंजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe