अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोणी बुद्रूक ग्रामपंचातीच्या वतीने कोव्हीड संकटाच्या काळात गावातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचा-यांनी घेतलेले
परिश्रम लक्षात घेता दिवाळी सणानिमित्ताने कर्मचा-यांना ७० दिवसांचा पगार बोनस म्हणून जाहीर करण्यात आला असल्याची माहीती उपसरंपच गणेश विखे यांनी दिली.
कोव्हीड संकटात ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिबंधात्क क्षेत्रासह सर्वच ठिकाणी उपाय योजना करण्यात आल्या होत्या. गावातील सर्वच विभागांमध्ये औषध फवारणी करुन निर्जतुकीकरण करणे, नागरीकांची तपासणी करणे,
विविध व्यवसायांच्या निमित्ताने दुकानांमधुन तसेच भाजी खरेदी करण्यासाठी येणा-या नागरीकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने नियमावलीही तयार करण्यात आली होती.
या नियमावलीचा एक भाग म्हणूनच व्यवसायीकांचे कोव्हीड टेस्ट करुण घेण्याची सुचना आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिका-यांना केली होती. ग्रामपंचायत पदाधिका-यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून कोव्हीड टेस्टचा सामुहीक उपक्रम राबविला.
या उपक्रमालाही ग्रामपंचायत कर्मचा-यांचे मोठे सहकार्य लाभले होते. ग्रामपंचायतीच्या मासीक सभेत कर्म-यांना ७० दिवसांचा बोनस देण्यासाठी ठराव घेण्यात आला. सदर ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.
यावेळी सरपंच सौ.कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे, रामभाऊ विखे, दिलीपराव विखे, भाऊसाहेब धावणे, प्रविण विखे, संभाजी विखे, गोरक्ष दिवटे, कैलास विखे, मयुर मैड, सरोज साबळे, ग्रामविकास आधिकारी संतोष थिगळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कर्मचा-यांना जाहीर झालेल्या बोनस मुळे कर्मचा-यांनी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिका-यांचे अभिनंदन केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम