चाँदबीबी महालावर करायचा लुटमार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- चांदबीबी महालावर पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटणारा आरोपी नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केला आहे. भरत मच्छिंद्र माळी (रा. सय्यदमीर लोणी ता. आष्टी जि. बीड) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्यावर अहमदनगर व बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. प्रवीण गोविंदराव निटूरकर (वय 52 रा. लक्ष्मीटॉवर, ज्ञानसंपदा शाळेच्या पाठीमागे, सावेडी) हे कुटुंबीयासह चांदबिबी महालाच्या डोंगरावरती पॉलिहाऊसकडे जाणारा कच्चा रस्त्यावर फिरण्यास गेले होते.

त्यांच्याकडील दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम, मंगळसूत्र असा एकूण 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चाकूचा व दगडाचा धाक दाखवून चोरट्यांनी लुटला होता.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीरून नगर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे,

पोलीस नाईक भानुदास सोनवणे, ज्ञानेश्‍वर खिळे, संभाजी बोराडे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe