अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar Crime :- सकाळी सकाळी पळण्यासाठी मित्रासोबत बाहेर पडलेला अल्पवयीन मुलगा घरी परत आला नाही. या प्रकरणी तोफखाना पोलिसांत फिर्याद दाखल होताच पोलिसांनी 12 तासात त्या मुलाचा मुंबईतून शोध घेवून त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
शिक्षक अजिनाथ सुदामा केंदळे (वय 37 रा. साईराम सोसायटी, नगर-कल्याण रोड, अहमदनगर) यांचा पुतण्या ओमकार भाऊसाहेब केंदळे (वय 16) व त्यांच्या गल्लीत राहणारा राम गणेश सोनवणे (वय 16 वर्ष) हे दोघे 18 मार्च रोजी सकाळी पळण्यासाठी घरातुन निघुन गेले.
ते परत आले नाही. त्यांचा शोध घेतला असता 19 मार्च रोजी सायंकाळी राम सोनवणे हा पुणे बस स्थानक येथे मिळुन आला. परंतु ओमकार मिळून न आल्याने अजिनाथ केंदळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस अंमलदार देविदास आव्हाड, साईनाथ सुपारी,
शैलेश गोमसाळे यांच्या पथकाने राम सोनवणे याच्या मदतीने मुंबई येथील दादर बस स्थानक परिसरामध्ये ओमकारचा शोध सुरू केला असता ओमकार मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत फिर्यादी अजिनाथ केंदळे यांच्याकडे दिले आहे.-