अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- राज्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. आता पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, पावसाचा मराठवाड्याला जबरदस्त तडाखा बसला आहे. 10 जणांचा मृत्यू झाला असून 200 जनावरं दगावली आहेत.
त्यामुळे येत्या 24 तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
उद्या हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार आहे. अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे.
अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे. या वादळामुळे राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील अनेक धरणे भरली असून तुफान पावसाने राज्यातली 82 टक्के धरणे भरली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम