राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंघटित कामगार सेलच्या सरचिटणीसपदी महेश गवई

Published on -

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (असंघटित कामगार विभाग सेलच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी जितेंद्र आव्हाड युवा मंच चे महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री महेश गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे पत्र श्री प्रदेशाध्यक्ष विलास भाऊ बडवाईक यांनी दिले.

असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली आहे सुप्रिया ताई सुळे यांनी महेश गवई यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या निवडी नंतर महेश गवई यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलं .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन प्रदेश अध्यक्ष विलास बडवाईक यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल कारण हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण या राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने बेरोजगारी वाढवलेली आहे.

अशातच या असंघटित कामगारांना संघटित करून त्यांचे न्याय हक्कासाठी नक्कीच लढा दिला जाईल येणाऱ्या काळात पक्ष वाढीसाठी देखील नक्कीच प्रयत्न करेन.अशी प्रतिक्रिया महेश गवई यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News