कर्जत नगरपंचायतीमध्ये महिलाराज! नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपनगराध्यक्षपद काँग्रेसकडे

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उषा राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान याबाबतची माहिती पीठासीन तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली आहे.

कर्जत नगरपंचायतीमध्ये दोन्ही पदाधिकारीपदी महिलांची निवड झाली आहे. यामुळे कर्जत नागरपंचायतवर “महिलाराज” निर्माण झाले आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी दि ९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उषा राऊत यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. सदरचा अर्ज वैध ठरला असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली होती.

मात्र १६ रोजी नगराध्यक्षपदासह उपनगराध्यक्ष पदाची अधिकृत निवड जाहीर होणार होती. आज सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी डॉ थोरबोले यांनी कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून उषा राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी घुले यांची निवड जाहीर केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe