शेतातील उसात लावलेल्या पिंजर्‍यात नर जातीचा बिबट्या जेरबंद

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :- अकोले शहरापासून जवळच असलेल्या महालक्ष्मी मंदिराजवळ शेतातील उसात वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून महालक्ष्मी परिसरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वनखात्याकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती.

त्यानुसार वन खात्याने संबंधित परिसरातील शेतात उसात पिंजरा लावला होता. आज सकाळी या पिंजर्‍यात बिबट्या अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत संबंधित बिबट्याची रवानगी मनोहरपूर रोपवाटिकेत केली. दरम्यान या परिसरात अजूनही एक दोन बिबट्यांचे वास्तव्य असल्याने वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिकांनी वन विभागाकडे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News