विवाहितेने माहेरी जात घेतला गळफास

Published on -

१ मार्च २०२५ अहिल्यानगर : नगर शहरातील सारसनगर येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीने माहेरी जेऊर (ता. नगर) येथे जावून वडिलांच्या राहत्या घराच्या छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

वैष्णवी गौरव कापरे (रा. सारसनगर, अ.नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.वैष्णवी हिने घराच्या छताला गळफास घेतल्याची बाब लक्षात येताच तिचा भाऊ श्रवण बाळासाहेब बनकर याने तिला तातडीने उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले.

तेथील डॉ. बटुळे यांनी तिला तपासून ती उपचारापूर्वीच मयत झाली असल्याचे घोषित केले. त्याबाबतचा अहवाल एमआयडीसी पोलिसांना पाठविला.या वरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe