अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी भाजीपाल्यासारखा मिळतो मावा गुटखा !

Updated on -

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गेल्या काही दिवसापासून मावा गुटखा या सुगंधी पदार्थांची अगदी खुलेआम सर्रास विक्री केली जात आहे. चौकात चौकात मावा गुटख्याच्या टपऱ्या सुरू असून, तिसगाव येथील वृद्धेश्वर चौक तसेच शासकीय विश्रामगृहा जवळच्या शासकीय जागेत मावा गुटख्याची खुलेआम विक्री केली जात असल्याने या मावा विक्रीला कोणाचा छुपा आशीर्वाद आहे. असा सवाल सर्वासमान्य उपस्थित करत आहेत.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे बाहेरगावहुन येणाऱ्या विद्यार्थिनींची टवाळखोर तरुणांकडून छेड काढली जात असल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्यानंतर पुढाऱ्यांसह पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. वृद्धेश्वर चौकातील दोन-तीन ठिकाणच्या मावा विकणाऱ्या टपरी चालकांवर पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली, मात्र इतर ठिकाणी खुलेआम मावा गुटखा विक्री सुरू आहे.

त्याकडे मात्र अन्न औषधसह पोलिसांनी डोळेझाक केली का? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. तिसगाव मधील मावा नगर, पुणेसह मुंबई पर्यंत पाठवला जातो. या मावा विक्रीतून लाखोंची कमाई केली जाते.

मावा तयार करण्यासाठी लाखो रुपये किमतीच्या मशिनरी देखील तिसगावमध्ये आहेत. त्यामुळे मावा विक्रीची ही व्याप्ती किती मोठी असणार हे यावरून स्पष्ट होते. असे असले तरी यावर एकदाही प्रशासनाने कारवाई करण्याचे धाडस दाखवलेले नाही.

त्यामुळे गुटखा आणि मावा विक्रीचे तिसगाव केंद्रच बनले आहे. येथील अवैध धंद्याप्रमाणेच मावा गुटखा विक्रीला देखील कोणाचा राजकीय वरहस्त आहे का ? कारण सरकारी जागेवर खुलेआम अनेकांनी टपऱ्या टाकून मावा विक्री सुरु केली असताना पोलीस प्रशासनाला गुटखा मावा विक्री करणारे दिसून येतात की नाही? असा सवाल सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe