पुन्हा पारा ४० अंशांवर, उष्ण वारे सक्रिय झाल्याने हवामानात अचानक बदल, पुढील चार दिवस..

Published on -

चार ते पाच दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेला पाऊस यामुळे वातावरणामधील उष्णता कमी झाली होती. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. परंतु पुन्हा एकदा काल रविवारी तापमानाचा पारा ३० ते ४० अंशांपर्यंत गेला होता. त्यामुळे उष्णतेची दाहकता प्रचंड वाढली.

अंगातून अक्षरशः घामाच्या धारा चाललेल्या होत्या. राजस्थान व गुजरातकडून उष्ण वारे सक्रिय झाले असल्याने उष्णता वाढली आहे. ही उष्णतेची तीव्रता आणखी चार ते पाच दिवस राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कायम आहे.

अवकाळी पावसाने वातावरणातील उष्णतेची तीव्रता कमी झाली होती. त्यानंतर पुन्हा जिल्ह्यात उष्णता आणखी तीव्र झाली आहे. ही उष्णतेची लाट आणखी चार पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. येत्या चार दिवसांत तापमानाचा पारा ४१ ते ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

शनिवार, रविवारी तापमानाचा पारा ३९ ते ४० अंशांवर होता. १६ आणि १७ मे रोजी जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, काही भागातच वादळी पाऊस झाला. इतरत्र मात्र उकाडा कायम होता. ठरावीक भागामध्येच पावसाने हजेरी लावली. वारेही ३० ते ४० कि.मी. वेगाने वाहत होते. त्यातच वातावरणामुळे आर्द्रतेचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त होते.

कशामुळे वाढली उष्णता ?
– राजस्थान व गुजरातकडून उष्ण वारे सक्रिय झाले असून हे वारे जमिनीपासून कमी उंचीवर आहेत. त्यामुळे उष्णतेची दाहकता अधिक आहे.
– एकीकडे तामिळनाडूसह दक्षिण भारत व ओडिशाच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात उष्ण वाऱ्यांमुळे तापमानाचा पाराही वाढत आहे.

जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता
हवामान खात्याने रविवारी यलो अलर्ट दिला होता. पुढील चार दिवस मात्र ग्रीन अलर्ट (कोणतीही धोक्याची सूचना नाही) देण्यात आला आहे. म्हणजे केवळ हलका पाऊस आणि वादळी वारे असतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनानेही माहिती दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe