Ahmednagar News : मुलीला मॅसेज, गावातील पालकांनी शिक्षकाला उचलून नेत यथेच्छ चोपले ! शिक्षणक्षेत्रात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चित्र विचित्र घटना घडण्याचे प्रमाण काही कमी होईना. आता शिक्षणक्षेत्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील नामांकित माध्यमिक विद्यालयातील शिक्षकाचा महाप्रताप उघडकीस आला आहे.

या महाशयाने इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीला चित्रविचित्र मॅसेज पाठवले. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी विद्यालयातून उचलून नेत बेदम चोप दिला आहे. या घटनेने या तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या विद्यालयाच्या शिक्षण संस्था चालकांनी, मुख्याध्यापकांनी असा काही प्रकार झाला नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहेत. याबद्दल विविध सुरस चर्चा सध्या ऐकू येत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील या नामांकित माध्यमिक विद्यालयात हा शिक्षक कंत्राटी तत्त्वावर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून काम करत आहे. संस्थाचालकाने मात्र या शिक्षकाला नारळ दिला असल्याची माहिती आता समजली आहे.

इयत्ता नववीच्या वर्गामध्ये शिकत असलेल्या मुलीला या माध्यमिक शिक्षक महाशयाने आपल्या जाळ्यात ओढून तिच्या मोबाईलवर अनेक मेसेज पाठवले. तर दुसरीकडे हे माध्यमिक शिक्षक महाशय या मुलीला बाहेर फिरायला घेऊनही जात असे.

त्यामुळे या मुलीच्या मोबाईलवर तिच्या कुटुंबीयांनी व पालकांनी हे मेसेज वाचले. या माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रम आटोपल्यानंतर एका वाडीमध्ये नेऊन या शिक्षकाची यथेच्छ धुलाई केली.

धुलाई केल्यानंतर परत असे प्रकार किंवा मेसेज करणार नाही व माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर सध्या पडदा पडला असल्याचीही चर्चा आहे.

 शिक्षणक्षेत्रात खळबळ

या संस्थेतील हा दुसरा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने व पालकांनी येथेच चोप दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe