विळदघाटात ५०० एकर जमिनीवर एमआयडीसी, सुप्यातून पळून गेलेल्या कंपन्याही परत आणणार ! खा.विखे यांची मोठी घोषणा

Updated on -

Ahmednagar News : खा. सुजय विखे दक्षिणेत चांगलेच सक्रिय झाले आहेत. विविध कामांचा सपाटाच त्यांनी लावला आहे. आता त्यांनी सध्या बेरोजगारांना काम देण्यासाठी व औद्योगिकरणातून नगरचा विकास करण्यासाठी एमआयडीसीकडे लक्ष केंद्रित केले आहे.

त्यांनी याचा पुनरोल्लेख करत एमआयडीसींबाबत सर्वाना शाश्वत केले. वडगाव गुप्ता (ता. नगर) येथे दक्षिण मतदारसंघातील नागरिकांना साखर व डाळ वाटपाचा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 काय म्हणाले खा.डॉ.सुजय विखे पाटील

नगर तालुक्यातील विळद घाटामध्ये ५०० एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव आहे तो देखील आता अंतिम टप्यात आला असल्याचे ते म्हणाले. त्याचे मूल्यांकन मंत्रालय स्तरावर असल्याचे त्यांनी सांगितले. या एमआयडीसीच्या माध्यमातून पाच ते सहा हजार युवकांना रोजगार मिळेल.

येथे मोठया औद्योगिक कंपन्या आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून सुपे एमआयडीसीतून अनेक कंपन्या पळून गेल्या, सोडून गेल्या आहेत त्यांनाही पुन्हा एकदा जिल्ह्यात आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, मंजाबापू घोरपडे, मधुकर मगर, संजय गिरवले, राजेंद्र गावखरे, पोपटराव घुंगर्डे, प्रतिक शेळके आदींची उपस्थिती होती.

२२ जानेवारीला आगळीवेगळी दिवाळी

२२ जानेवारीला एक आगळीवेगळी दिवाळी साजरी करणार असल्याचे खा. विखे यावेळी म्हणाले. त्यांचा रोख राम मंदिर उदघाटनाकडे होता. ज्या गावांमध्ये राम मंदिर व हनुमान मंदिर आहे तेथे २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांना लाडूच्या प्रसादाचा नैवेद्य दाखवणार असून, ही संकल्पना दक्षिण मतदारसंघात सुरू केली असल्याचे ते म्हणाले. तसेच

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News