Ahmednagar News : अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Published on -

Ahmednagar News : मोटारसायकलवरुन चाललेल्या परप्रांतीय कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.४) सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली.

विरेंद्र सिंग (वय-२९, हल्ली रा.नगर, मूळ रा. मध्यप्रदेश) असे मयत कामगाराचे नाव आहे. तो बाबुर्डी घुमट शिवारात असलेल्या विद्यापीठ उपकेंद्रात सुरु असलेल्या कामावर कामगार होता

मयत विरेंद्र सिंग हा सोमवारी (दि.४) सायंकाळी ४.३० च्या सुमारास बाबुर्डी घुमट ते वाळकी रोडने वाळकीकडे मोटारसायकलवरुन जात असताना

त्यास बाबुर्डी घुमट गावाचे शिवारात कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक देवून ते वाहन निघून गेले.

या अपघातात त्याला जबर दुखापत होऊन तो मयत झाला. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe