पशुखाद्याचे दर वाढल्याने दुध धंदा अडचणीत

Published on -

Ahmednagar News : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच अडचणीत आला असून त्यात भर म्हणून की काय, शेतमालाला बाजार भावही नाही. त्यामुळे शेतकरी संकटामध्ये भरडला जात आहे. पूर्वीपासून शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाला प्राधान्य देत आला आहे;

परंतु दुधाला पाव नसल्याने हाही धंदा आता आतबट्ट्याचा झाला आहे. त्यात चारा व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे.

दुध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून सर्वांना परिचित आहे. जोपर्यंत दुधाला ३५ रुपये लिटर भाव होता, तोपर्यंत धुग्ध व्यावसायिक नफ्यात होते; परंतु मागील दोन वर्षांमध्ये हा भाव २३ रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे हा धंदा परवडेनासा झाला आहे.

त्यात चारा व पशुखाद्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे दूध व्यवसाय संकटात आला आहे. शेतकरी हतबल झाला आहे. पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत असल्याने पशुधन जोपासणे आता मोठे अवघड होऊन बसले आहे.

त्यामुळे जर अशीच परिस्थिती कायम राहिली, तर पशुधन व्यवसाय बंद करावा लागेल. ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीस काढली आहे. त्यामुळे शासनाने दुधाचे दर वाढविण्यासह आर्थिक मदत दूध शेतकऱ्यांना कुणाचा आधार,

हाच उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची प्रश्न सतावत आहे. पशुखाद्याच्या गरज असून शासनाकडे दूध दरावाढीमुळे दुधाच्या उत्पन्नापेक्षा उत्पादक शेतकरी मागणी करीत तर पशुधनाच्या चाऱ्यासाठी अधिकच आहेत.

अलीकडे पशुखाद्यात कधी नव्हे ती विक्रमी वाढ नमूद करण्यात आली असल्याने पशुपालक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पशुधनांना जगविण्यासाठी पशुखाद्यच महागले आहे.

उदरनिर्वाह करणे शेतकरी बांधवांना कठीण होऊन बसले आहे. सुरुवातीच्या काळात पशुपालक शेतकऱ्यांना व्यवसायातून चांगला मोबदला मिळाला; मात्र आता गेल्या काही वर्षांपासून पशुखाद्याच्या दरात वाढ होत असल्याने दुधाला आधी जेवढा भाव मिळत होता, तेवढाही मिळत नसल्याने पशुपालक शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे. परिणामी दुग्धव्यवसायासह शेतकरी संकटात आला आहे.

■ गव्हाणीत जनावरांची संख्या घटली

एक तर दुधाला भाव नाही, त्यात पशूखाद्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील जनावरांची संख्या कमी करण्याकरीता जनावरे विक्रीस काढली असून अनेकांनी विकलीही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गव्हाणीतील जनावरे कमी झाली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe