अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे पूत्र उदयन गडाख यांची मुळा एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी ‘मुळा’ची स्थापना केली होती त्यानंतर प्रशांत गडाख यांनी कृषी महाविद्यालय, फार्मसी सह विविध महाविद्यालये चालू केली आहेत.
विविध सामाजिक क्षेत्रात या संस्थेचा मोठा सहभाग असतो. मुळा एज्युकेशन संस्थेचे सोळा माध्यमिक विद्यालय, सहा इंग्रजी माध्यमाचे विद्यालय तर अन्य सात महाविद्यालय असून 20 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
संस्थेचा एकूण 1300 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. संस्था व यशवंत प्रतिष्ठाणच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख हे आजारी असल्याने प्रशासकीय अडचण पाहता मुळाचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव गडाख व विश्वस्त मंडळाच्या झालेल्या
बैठकीत सर्वानुमते उपाध्यक्षपदी उदयन शंकरराव गडाख यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम