अल्पवयीन मुलीचे वडगावातून अपहरण

Published on -

५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : वडगाव गुप्ता शिवारातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना २ मार्च रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी घरात दिसून न आल्याने तिच्या घरच्यांनी तिचा वडगाव गुप्ता परिसरात, तिच्या मैत्रिणीकडे व नातेवाईकांकडे चौकशी करत शोध घेतला. मात्र ती कोठेही मिळून आली नाही. यावरून तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले असल्याची त्यांची खात्री झाली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe