अल्पवयीन मुलीला पळवून नेले! लागोपाठ दोन घटना घडल्याने खळबळ

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- राहुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेल्याची घटना घडली.

गेल्या चार दिवसात मुलीच्या अपहरणाच्या लागोपाठ दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी किराणा सामान घेण्यासाठी गावात आली होती.

माञ अज्ञात इसमाने या मुलीला जबरदस्तीने पळवून नेले. मुलीच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिल्याने अज्ञात व्यक्तीविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी अपहरण करणाऱ्याचे नाव राहुरी पोलिसांना दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र संबधित व्यक्ती व मुलीचा पोलिसांना तपास लागलेला नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe