‘मिशन आरंभ’ : जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांची दांडी एकूण ३८५ केंद्रावर झाली परीक्षा

अहिल्यानगर : जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत मिशन आरंभ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाया इ.४थी व ७ वी तील विद्यार्थ्यांची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परिक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेची तयारी व्हावी, यासाठी रविवारी १६ मार्च रोजी मिशन आरंभ परिक्षेचे जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून आयोजन केले होते.

या परिक्षेतून विद्यार्थ्याची शिष्यवृती परिक्षेची तयारी होण्यास, परिक्षेबद्यलची भीती दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत होणार आहे. या परिक्षेचे आयोजन जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांनी केले होते. सदर परिक्षा जिल्ह्यातील ३८५ परिक्षा केंद्रावर घेण्यात आली.

सदर परिक्षेसाठी इ.४ थी चे ४९ हजार ८३३ व इ.७ वीचे ९१७६ असे एकुण ५९००९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी इ ४ थीचे ४८००३ व इ.७ वीचे ८७५४ विद्यार्थी उपस्थित होते.

सदर परिक्षेस जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे खातेप्रमुख तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी भेटी दिल्या. सदर परिक्षेचा अंतिम निकाल संकेत स्थळावर दि.२५ रोजी विद्यार्थी,शिक्षक व पालक यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करणाात येणार आहे.

मिशन आरंभ परिक्षेमुळे विद्यार्थी शिष्यवृती परीक्षेच्या अभ्यासक्रमाशी इयत्ता तिसरी पासूनच परिचित झाले आहेत. या परीक्षेंसाठी वर्षभर विद्यार्थ्यांचा सराव घेण्यात आला. या परिक्षेमुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा पाया मजबूत होण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांच्या अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe