संगमनेरच्या विकासासाठी आमदार अमोल खताळ यांचा पुढाकार, विकासकामांसाठी ११ कोटींचा निधी मंजूर

Published on -

संगमनेर- तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते आणि इतर विकासकामांसाठी ११ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी नव्या खोल्या बांधल्या जाणार आहेत. याशिवाय, नागरिकांना मूलभूत सुविधा देणारी अनेक कामेही हाती घेतली जाणार आहेत, असे खताळ यांनी सांगितले.

या निधीमुळे तालुक्यातील विकासकामांना गती मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडे दाखल झालेले प्रस्ताव मंजूर झाल्याने हा निधी उपलब्ध झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केल्याचे आमदार खताळ यांनी आवर्जून नमूद केले.

त्यांच्या पाठिंब्यामुळे संगमनेरच्या विकासाचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. या निधीतून तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते, शाळा आणि इतर सुविधांवर भर दिला जाणार असून, यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

या निधीतून तालुक्यातील १९ महत्त्वाच्या रस्त्यांसाठी ३ कोटी ७० लाख रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये चिखली ते केरेवाडी रस्त्यासाठी २० लाख, वडगाव लांडगा ते दातीर वस्ती ३० लाख, राजापूर ते खतोडे मळा ३० लाख, धांदरफळ खुर्द ते धांदरफळ बुद्रुक पूल दुरुस्तीसाठी ४० लाख, नांदूरी दुमाला ते ठाकरवाडी २० लाख, निमगाव खुर्द ते चंदनवाडी ३० लाख, सायखिंडी ते कारवाडी २० लाख, संगमनेर ते झोळे ३० लाख रूपये.

तसेच कासारे ते कानकाटे वस्ती ४० लाख, वडझरी ते कारेवाडी ३० लाख, कुंभारदरा ते कर्जुलेपठार ३० लाख, कोठे मलकापूर ते ठाकरवाडी ३० लाख आणि नांदूरखंदरमाळ ते खैरदरा रस्त्यासाठी ३० लाख रुपये मिळाले आहेत.

याशिवाय कासारा दुमाला ते मंगळापूर ५० लाख, वेल्हाळे ते सायखिंडी मोठेबाबा ३० लाख, कोकणगाव ते निझर्णेश्वर ४० लाख, रायतेवाडी ते हिवरगावपावसा ५० लाख, सुकेवाडी ते कसबेवाडी २० लाख आणि सावरचोळ ते शिसरगाव जवळेबाळेश्वर रस्त्यासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

शिक्षणाच्या दृष्टीनेही हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांसाठी १ कोटी १२ लाख रुपये मंजूर झाले असून, यातून बिरेवाडी येथे २ खोल्या, पिंपळगाव कॉझीरा १, निळवंडे १, डोळासणे १, हिवरगावपावसा १, तळेगाव येथील धनगरवाडी १, पोखरी हवेली १ आणि मांडवे बुद्रुक येथे १ खोली बांधली जाणार आहे.

या खोल्यांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी चांगली सुविधा मिळेल आणि त्यांची अडचण दूर होईल. याशिवाय, आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून २ कोटी ८६ लाख रुपये महायुती सरकारने मंजूर केले आहेत.

या निधीतून सभागृह, गावांचे सुशोभीकरण, सभामंडप, मंदिर दुरुस्ती, दशक्रिया विधी घाट यांसारखी सार्वजनिक कामे होणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. या सर्व कामांमुळे संगमनेरचा विकास नक्कीच नव्या उंचीवर जाईल, अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe