कोपरगावचा पाणीप्रश्न आमदार आशुतोष काळेच सोडवणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-  चाळीस वर्ष सत्ता भोगूनही ज्यांना कोपरगावचा पाणी प्रश्न समजला नाही त्यांना ५ नंबर साठवण तलावाचे महत्व मात्र समजले आहे.

५ नंबर साठवण तलावाबरोबरच वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी आमदार आशुतोष काळे यांनी मिळविल्यामुळे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न निकाली निघून आजवर पाणी प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या कोल्हे कुटुंबाला आपले राजकीय अस्तित्व संपते की काय? अशी भीती वाटू लागली.

त्यामुळे त्यांनी दिशाभूल करण्याचे काम सुरु केले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्यावर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली.

विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार आशुतोष काळे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतांना सुनील गंगुले यांनी म्हटले आहे की, मागील पाच वर्षात राज्यात आणि केंद्रात एकहाती सत्ता असतांना देखील कोल्हेंना शहराचा पाणीप्रश्न सोडविता आला नाही.

ते काम आमदार आशुतोष काळे यांनी दोनच वर्षात करून दाखवल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी ही त्यांची पोटदुखी आहे. तलावाच्या माध्यमातून शहराचा पाणीप्रश्न सुटणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe