Ahmednagar News : नेवासा तालुक्यात आमदार शंकरराव गडाख हे राज्याच्या मंत्रिमंडळात असताना जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यात कोटीहून अधिक निधी आणण्यासाठी यशस्वी झाले.
या निधीतून काम सुरू झालेल्या वडुले, पाथरवाला, सुलतानपूर, नांदूर शिकारी, सुकळी खुर्द व बुद्रुक या पाच गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची आ. गडाख यांनी नूकतीच पहाणी केली.

विशेष प्रयत्न करून आ. गडाख यांनी ३२.५० कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता. या कामाची प्रत्यक्ष स्थळी नांदूर शिकारी येथे कामावर जाऊन पाणी साठवण टाक्यांसाठी सुरू असलेल्या खोदकामाची पाहणी त्यांनी केली.
या प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यास काम उत्कृष्ट दर्जाचे करण्याच्या सूचना दिल्या. ही पाणी योजना मंजूर करण्यासाठी वन खात्याची अडचण येत होते परंतु आ. गडाख यांनी पाठपुरावा करत अडचण सोडली होती.
यावेळी परिसरातील शेतकरी विविध समस्या मांडण्यासाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पाट पाण्याच्या संदर्भात आ. गडाख यांच्याशी चर्चा केली. पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली.
या वेळी शेतकऱ्यांशी बोलताना गडाख म्हणाले, या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने टेलच्या भागाला पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. तरीही पाण्याचे योग्य नियोजन होण्याकरिता मी प्रयत्न करील.
त्याच बरोबर विरोधी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली तरी संघर्ष करू, असे आश्वासन आ. गडाख यांनी दिले. यावेळी वडुले, पाथरवाला, सुलत नपूर, नांदूर शिकारी, सुकळी खुर्द व बुद्रुक परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.