अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून काही प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्याने बस स्थानके ओस पडली आहेत. त्यामुळे या परिसरात कचऱ्यांचे ढिग आता साचू लागले आहे.
यामुळे पारनेरचे बस स्थानक सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे ओस पडलेल्या स्थानकावर कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत.
तर काही बस स्थानके रात्रीच्या वेळी अवैध धंद्यांचे अड्डे बनत आहेत. प्रवासी नसल्याने येथे तळीराम, भिकारी व फेरीवाले तसेच रिकाम टेकड्यांनी या स्थानकावर कब्जा केला आहे.
सुपा बस स्थानकावर काही महाभागानी भंगार डेपोच सुरू केला आहे. तेथे दिवसभर गोळा केलेल्या भंगाराचा डेपो लावला जातो व पुढे मोठ्या वाहनांमधून माल सप्लाय केला जातो.
भंगाराच्या साहित्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अधिकाऱ्यांनी किमान याकडे तरी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम