अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar Politics :- ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी भुईकोट किल्ल्याचा इतिहास सुप्रिया सुळे यांना सांगितला. भुईकोट किल्ला हा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे.
या ठिकाणी पर्यटकांना भुईकोट किल्ला पाहण्यासाठी परवानगी मिळत नाही. तरी संरक्षण खात्याच्या अटी शर्ती व नियम शिथील करून पर्यटकांना कायमस्वरूपी भुईकोट किल्ला पाहण्यासाठी खुला करावा जेणेकरून नगर शहराच्या पर्यटन चळवळीला व व्यवसायी करण्याला चालना मिळेल.

यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.
किल्ल्याचा इतिहास 1942 च्या इंग्रजांविरोधात महात्मा गांधींनी पुकारलेल्या ‘चले जाव’ चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करून अहमदनगरच्या याच भुईकोट किल्ल्यात बंद करून ठेवले होते.
याचदरम्यान पंडित नेहरूंनी जगप्रसिद्ध ग्रंथ ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ (भारत एक खोज) लिहिला. पंडित नेहरूंनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही या ठिकाणी जतन करून ठेवलेल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची पाहणी करून मनाला खूप आनंद झाला आमदार संग्राम जगताप यांनी मांडलेले प्रश्न केंद्र सरकारकडून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.