अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती वरची बंदी उठवल्या नंतर आमदार अरुणकाका जगताप, आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषदेचे मा.सदस्य सचिन जगताप यांनी खिल्लारी बैलांचे पूजन करून आनंदोत्सव साजरा केला.(MLA Sangram Jagtap)
नुकतीच बैलगाडा शर्यती वरची बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्रमध्ये जुनी परंपरा आहे.
शेतकरी बांधव गावोगावी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत असतात. त्यामुळे ही परंपरा पुन्हा एकदा सुरु झाली आहे त्यामुळे सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बैलगाडा संघटनेने न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेत मुळे न्याय मिळाला आहे त्यामुळे मी सर्व संघटनांचे आभारी आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
दरम्यान 2017 साली न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. त्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये बैलगाडा प्रेमीनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नुकतेच या निर्णयावर चर्चा होऊन बंदी घालण्यात आलेल्या बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सशर्त सुरू करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम