अहमदनगर : कोरोना काळात हजारो नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार नीलेश ज्ञानदेव लंके यांची माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी अमृतमहोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा प्रा. मधु दंडवते ‘आदर्श लोकप्रतिनिधी’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सोमवारी, दि. ८ डिसेंबर रोजी नगरयेथे होणाऱ्या समारंभात आ. लंके यांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
पारनेर आणि नगर तालुक्यातील दुष्काळ आणि मुलभूत प्रश्न, देशात कोरोना संसर्गाची परिस्थिती असताना हजारो लोकांची नि:शुल्क उपचार देउन वाचविलेले प्राण, मतदारसंघातील विस्थापन रोखण्यासाठी औद्योगिकरणात दिलेले योगदान आणि निर्माण केलेल्या रोजगाराच्या संधी, सर्वसामान्यांसाठी सततची उपलब्धता, अण्णा हजारे यांनी मागील दशकात छेडलेल्या विविध जन आंदोलनातील सहभाग या पैलूंचा विचार करून पुरस्कार समितीने लंके यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
प्रा. मधु दंडवते जन्मशतमाब्दी महोत्सव समिती, स्नेहालय, रावसाहेब पटवर्धन स्मारक, राजमुद्रा अकादमी, मेजर दिनूभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळ, पेमराज सारडा महाविद्यालयाचा राज्यशास्त्र विभाग, स्वयंसेवी संस्थांचा महासंघ आदी संस्थांनी एकत्रीतपणे या समारंभाचे आयोजन केले आहे.