आमदार प्राजक्त तनपुरे आक्रमक ! म्हणाले हे गतिमान नव्हे तर मतिमंद सरकार

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी मतदारसंघातील सुमारे २९ कोटी रुपयांची रस्ता विकासाची कामे गेल्या चार महिन्यांपासून कार्यारंभामुळे या सरकारने रखडविलेली आहेत. असे हे सरकार विकासाच्या कामात अडथळा आणत आहे.

यांना विकासाच्या कामाच्या फाईलवर सह्या करायला वेळ नाही; मात्र विरोधकांची कामे हाणून पाडण्यात व त्यांना गुंतवण्यात वेळ आहे. हे गतिमान नव्हे तर मतिमंद सरकार आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.

राहुरी – नेवासा रोडवर आरडगाव येथे रस्तारोको आंदोलनप्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते. राहुरी मतदारसंघातील राहुरी, पाथर्डी व नगर येथील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर असलेल्या व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही कार्यारंभ आदेश देण्यास शासनाकडून विलंब होत आहे.

या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सकाळी आरडगाव येथे मुख्य चौकात शेकडो शेतकरी व ग्रामस्थांसमवेत सुमारे अर्धा तास रस्तारोको आंदोलन आमदार तनपुरे यांनी केले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, की जोपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून लेखी ठोस उत्तर मिळत नाही. तोपर्यंत रस्ता रोको थांबणार नाही व येथून उठणार नाही. अशी भूमिका घेतल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची पंचायत झाली. त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधात आमदार तनपुरे यांची भूमिका सांगितली.

त्यानंतर सुरुवातीला एक महिन्याची मुदत मागितली; पण तनपुरे यांनी यास नकार दिला. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे उपअभियंता एस. जी. गायकवाड यांनी उद्यापासूनच

आरडगाव सबस्टेशन ते केंदळ बुद्रुक रस्त्याचे तसेच राहुरी ते वाघाचा आखाडा, टाकळीमियाँ, लाख रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल व उर्वरित सर्व कामे १८ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले.

हे मान्य करत तनपुरे यांनी तसे झाले नाही तर १९ तारखेला राहुरी येथे नगर- मनमाड रोडवर पुन्हा तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe