आ.रोहित पवार यांच्याकडून ३० हजार कुटूंबाना मदत

Published on -

जामखेड : मतदारसंघाला नेहमीच आपलं कुटुंब समजुन,अडचणीच्या काळातही प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून दात्रुत्व स्विकारणारा आमदार रोहित पवार यांचा ‘मदतीचा हात’ कर्जत जामखेडच्या गरजू,गोरगरीबांना ‘आपला हक्काचा माणुस’ असल्याची जाणीव करून देत आहे.

आ.रोहित पवार यांच्या याच दात्रुत्वातुन कर्जत-जामखेडसाठी पुन्हा एकदा भक्कम ‘मदतीचा हात’ पुढे आला आहे. कर्जत व जामखेड या दोन्हीही तालुक्यातील तब्बल ३० हजार कुटुंबांना पुरेल एवढा ८ ट्रक कांदा-बटाटा (दि.२५ रोजी) पोहोच करण्यात आला आहे.

यामध्ये ४ ट्रक कांदा-बटाटा कर्जतसाठी पंचायत समितीचे गट विकासाधीकारी अमोल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून व ४ ट्रक कांदा-बटाटा जामखेडसाठी पोहोच झाला आहे.

कोरोनाशी लढणाऱ्या मतदारसंघातील प्रत्येक गरजू,गोरगरीबाची भूक भागवून राज्यभर कोरोनाशी लढणाऱ्या ‘कोरोना वॉरीअर्स’ना सॅनीटायझर व इतर सुविधा देऊन प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आ.पवार यांच्या उपक्रमांनी राज्याच्या आरोग्य यंत्रणेलाही मोठा दिलासा दिला आहे. आ.पवार यांनी यापूर्वी ४ ट्रक कांदा-बटाटा, ५ ट्रक गहू आणि तूर डाळ असे धान्य पोहोच केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe