कर्जत-जामखेड करांसाठी आमदार रोहित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली ही मागणी !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या कुकड़ी डाव्या कालव्यावर कर्जत तालुक्यातील ५४ गावे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. अशातच खरीप हंगामातील आवर्तन नुकतेच पूर्ण झाले असून आवर्तन कमी दाबाने असल्याने काही गावातील लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचले नाही.

शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष, मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून एक अतिरिक्त पावसाळी आवर्तन सोडण्याबाबत विनंती केली आहे.

सध्या कुकडी धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे आणि धरणाची पाणी पातळीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे आवर्तन सुरू करता येऊ शकते तरी कर्जत तालुक्यातील कुकडी व सीना कालव्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एक अतिरिक्त पावसाळी आवर्तन सोडण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक अतिरिक्त पावसाळी आवर्तन सोडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आमदार रोहित पवार यांनी केले होते. तसेच यंदाही अतिरिक्त आवर्तन सुटावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एक अतिरिक्त आवर्तन सोडण्याबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कुकडी डाव्या कालव्याचे खरीप हंगामातील आवर्तन नुकतेच पूर्ण झाले. मात्र आवर्तन कमी दाबाने असल्याने काही गावातील लाभार्थी पाण्यापासून वंचित आहेत. तरी त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान- टाळण्यासाठी एक अतिरिक्त पावसाळी आवर्तन सुरू करण्याबाबत आदेश द्यावे. अशी विनंती कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटून केली. नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामातील आवर्तनाची तारीख वाढवून त्यांनी मदत केली होती. त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा झाला. यंदाही ते मदत करतील अशी अपेक्षा – आ. रोहित पवार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe