आमदार रोहित पवारांच्या मतदार संघात ‘त्या’ कामासाठी मिळाले तब्बल ११कोटी ७९लाख रुपये!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  शासनातर्फे १९७२ पासून बांधण्यात आलेल्या विविध जलसाठ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आल्याने आघाडी सरकारने ‘मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता.

दरम्यान, कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक जलसाठ्यांमधून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता.

दरम्यान हा अपव्यय थांबवण्यासाठी व जलसाठ्यांना पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार्याने कर्जत जामखेड तालुक्यात राबविण्यात येणार आहे.

जामखेड तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांचं सर्वेक्षण केले असता त्यामध्ये गेल्या काही वर्षात झालेली कामे ही कमी प्रतीची झाल्यामुळे जल साठ्यांमधून गळती होत होती असे निदर्शनास आले.

त्यानुसार मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत कर्जत व जामखेड तालुक्यातील विविध बंधारे व पाझर तलावांची दुरूस्ती करण्यात येणार आहे.

यामध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील एकूण ६९ जलसाठ्यांच्या दुरुस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहेत. संबंधित जलसाठ्यांच्या दुरुस्ती कामासाठी आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून पाझर तलाव व बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी एकूण ११कोटी ७९ लाख रुपयांच्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe